मुंबई : कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा असा टोला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे.
देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
कोविडच्या युद्धात आता संरक्षण दलास उतरावे लागले. रशियाची लसही भारतात पोहोचत आहे. पाकिस्तानसारखा देशही भारताला आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करू इच्छितो. मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी व सर्वसमावेशक राष्ट्रीय योजना बनवून त्यात सर्वपक्षीय नेत्यांना सामील करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाने डोळे उघडले हे ठीक, पण केंद्र सरकारने उघड्या डोळय़ाने पाऊल टाकावे हेच खरे! असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
यावरून आता राजकारण चांगलच पेटलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरून शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना चांगलच फैलावर घेतले आहे. ‘न्यायालयाच्या पदराआड मोदी द्वेषाचा कंड भागवणाऱ्या सामनाच्या कार्यकरींनी केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न अग्रलेखात केलाय. त्याच न्यायालयांनी कोरोनासह अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेही सांगा कधी तरी.’ असे ट्विट करत भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
न्यायालयाच्या पदराआड मोदी द्वेषाचा कंड भागवणाऱ्या सामनाच्या कार्यकरींनी केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न अग्रलेखात केलाय.
त्याच न्यायालयांनी कोरोनासह अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेही सांगा कधी तरी. pic.twitter.com/hJzwIHJof5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 29, 2021
महत्वाच्या बातम्या
- लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा आहे असं दिसतंय, न्यायालयाने केंद्र सरकारला झापले
- मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच; धनंजय मुंडे यांची पंकजांसाठी भावनिक पोस्ट
- हैदराबाद विरुद्ध प्लेसिसकडून ‘खास’ विक्रमाची नोंद; सीएसकेचा केवळ दुसराच खेळाडू
- कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा : संजय राऊत
- लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर भडकले,ट्वीट करत केली नाराजी व्यक्त


