🕒 1 min read
बीड : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यावर प्रतिक्रीया देताना पंकजा यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांनी भावनिक पोस्ट केलीय. यामध्ये धनंजय यांनी पंकजांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने उपचार घेण्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, असा विश्वासही व्यक्त केलाय.
या संदर्भात धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या.’
ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या @Pankajamunde ताई. https://t.co/vgZ1Uvkbgt
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 29, 2021
धनंजय मुंडे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून आतापर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सर्वांनीच पाहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा परभव केला होता. त्यानंतर दोघांमधील राजकीय मतभेद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या निमित्त धनंजय यांनी पंकजा यांच्यासाठी केलेली भावनिक पोस्ट, दोघांमधील नात्याला पुन्हा पहिल्यासारखे करेल, अशी आशा केली जातेय.
महत्त्वाच्या बातम्या
- लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर भडकले,ट्वीट करत केली नाराजी व्यक्त
- कोरोना विरोधातील लढाईत भारताला रशियाची मदत, अमेरिकेनेही रवाना केलं विमान
- पराभवातही कर्णधार वॉर्नरने रचला इतिहास; बनला आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- पीएम केअर्स फंडातून तब्बल एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी
- पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
