Share

हैदराबाद विरुद्ध प्लेसिसकडून ‘खास’ विक्रमाची नोंद; सीएसकेचा केवळ दुसराच खेळाडू

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

हैदराबादने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरानी शतकी सलामी देत विजयाचा पाया उचलला. या शतकी भागीदारीदरम्यान दोन्ही सलामीवीर ऋुतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. यावेळी डुप्लेसीसने आपला फॉर्म कायम ठेवत अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह डु प्लेसिस हा चेन्नईकडुन सलग तीन सामन्यात शतक ठोकणारा दुसराच खेळाडू बनला आहे.

आयपीएलमध्ये चेन्नईकडून सलग तीन अर्धशतक झळकावण्याचा पहिला मान हा डु प्लेसिस चा सलामीचा जोडीदार ऋुतुराज गायकवाड याच्या नावे जातो. ऋुतुराजने आयपीएल २०२० च्या हंगामातील सीएसकेच्या आखेरच्या तीन सामन्यात सलग अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी ऋुतुराजने आरसीबी, केकेआर आणि पंजाब संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!