मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी INS विक्रांत प्रकरणी मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यानंतर आता माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान ५७ कोटी ते १०० कोटी रुपयांची रक्कम सोमय्यांनी निवडणूक आणि आपल्या मुलाच्या कंपनीत वापरली आहे. यामध्ये माजी सैनिकांनीही निधी दिला होता परंतु तो निधी राजभवनात पोहोचलाच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नील सोमय्या यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमय्या पिता-पुत्र अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “Mark my words INS विक्रांतच्या नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेटा यांना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हे महाराष्ट्र द्रोही तर होतेच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचाराच लागेल.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र
World Health Day : गेल्या 8 वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाले- नरेंद्र मोदी
IPL 2022 KKR vs MI : पुण्यात पॅट पेटला..! मुंबईविरुद्ध कमिन्सची रेकॉर्डतोड फलंदाजी; नक्की वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

