Share

एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; संजय राऊतांचा भाजपला इशारा

Published On: 

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

राज्यातील एसटी कामगारांचा संप कोण चिघळवतंय, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्यांनी आजवर कामगारांच्या घाम आणि श्रमाचा नेहमीच तिरस्कार केला ते आज एसटी कामगारांच्या बाजूने उभे राहिले आहेत. मात्र, एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. एसटी कामगारांचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून प्रलंबित असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!