औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
शिवसेना सेठजी, बिल्डरचा पक्ष नाही. विरोधकांना लोकांची डोकी भडकवायची आहेत. एसटी कामगार संप जे चिघळवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. भाजप नेते एसटी आंदोलनात जात आहेत. जमलं तर त्यांना नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. डोकी भडकावून भाजपला लाभ घ्यायचा आहे. पण यातून कामगार मरतोय, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना हा सेठजी, बिल्डरांना पक्ष नाही. हा कामगारांचा मोर्चा आहे. ज्यांना कामगारांच्या घामाचा वास यायचा ते त्यांचा संप चिघळवत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून औरंगाबादेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने ते औरंगाबादमध्ये आले आहेत. राज्यात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता- अजित डोभाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

