मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. अनेक कलाकार देखील पर्यावरणपूरक गणपती करण्यास अधिक प्राधान्य देतात. नुकतेच अभिनेता अमेय वाघ याने घरीच्या घरी गणपतीची मूर्ती साकारल्याचा व्हिडीओ सोशल मिदैयाव्र शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CTmqpU3JDlh/?utm_source=ig_web_copy_link
अमेयने इन्स्टाग्रामवर गणपतीची मूर्ती साकारत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जी शक्ती आपलं आयुष्य घडवते. तीची मूर्ती घडवायचा प्रयत्न! आमच्या शेजारी चारू रसाळ यांनी मार्गदर्शन केले आहे.’ असे त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. अमेयने शेअर केलेल्या या रीलमध्ये त्याने गणपतीची मूर्ती उत्कृष्ट साकारली असल्याचे दिसत आहे.
अमेयप्रमाणे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील गेल्या तीन वर्षांपासून सोनाली घरीच्या घरीच गणपती साकारत आहे. यावेळी देखील सुंदर गणपतीची मूर्ती तिने आणि तिच्या भावाने मिळून साकारली आहे. याचा एक सुंदर व्हिडीओ देखील तिने शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना


