🕒 1 min read
पिंपरी चिंचवड : मी येणारच असे काही लोक सतत सांगत होते. पण ते येणारच हे काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्या लोकांकडून सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. तसेच आमच्या सत्ताधारी नेत्यांवर होत असलेल्या चौकशा या राजकीय आकसाने सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला.
पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. ‘चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असा दावा पवारांनी केला.
निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे काही परत आले नाहीत. तेव्हा राज्य अस्थिर करण्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केले. २० वर्षाहून अधिक काळ ते विधिमंडळत होते. पण त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्याविरोधात खटले सुरू झाले. त्यांच्या जावयाविरोधात खटले सुरू झाले, असंही शरद पवार म्हणाले.
‘अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण १४ ते १५ लोक पाच दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितले जात होते. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते’ असे पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- तालुक्यात विकासकामं केल्यावर मला शांत झोप लागते; दत्तामामांचा हर्षवर्धन पाटलांना सणसणीत टोला
- बाबांनो…तरीही पवारसाहेबांना पण विचारावं लागणार आहे; अजित पवारांचा यु टर्न
- उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील
- ‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’
- ‘घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची जाणीव झाली असती’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
