Share

बाबांनो…तरीही पवारसाहेबांना पण विचारावं लागणार आहे; अजित पवारांचा यु टर्न

Published On: 

पुणे : ‘बाळासाहेबांनंतर तावरे आडनाव सोडून माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष असेल, असे मी सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभेत बोलल्याची गोष्टी खरी आहे. पण, बाबांनो…हे होत असताना पवारसाहेबांनाही विचारावे लागणार आहे. पवारसाहेबांच्या मनात आले तरच तसे होणार आहे. असे असताना येथे मात्र काहींनी लगेच अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली, हे बरोबर नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब तावरे यांचे अध्यक्षपद कायम ठेवले आणि अध्यक्षबदलाच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादीची सत्ता असो अथवा विरोधकांची…माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष तावरे आडनावाचाच असतो. या राजकीय समीकरणावर मोठे भाष्य करीत खुद्द अजित पवार यांनी मागील महिन्यात ‘सोमेश्वर’च्या शेतकरी मेळाव्यात यापुढे तावरे आडनाव वगळून ‘माळेगाव’चा अध्यक्ष असेल,’ असे विधान केले होते. त्या विधानाचे पडसाद ‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात उमटले होते.

विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरेंनंतर ‘माळेगाव’चे अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. ज्येष्ठ संचालक ॲड केशवराव जगताप, संचालक योगेश जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव आदी संचालकांपैकी एकाला अध्यक्षपद मिळू शकते, याबाबतच्या चर्चेने जोर धरला होता. तोच धागा पकडत कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात पवार यांनी बाळासाहेब तावरेंच्या अध्यक्षपदाबाबत निर्णायक भूमिका मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!