Share

उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील

Published On: 

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून भाजपवर टीका करण्याची एक संधी सोडली नाही. त्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचा कोणता नेता मागे हटला नाही. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांचं भाषण हे दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणावरुन टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे यांच्या भाषणानंतर पाटील यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

ठाकरे हे राज्यातील विविध प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर न बोलता त्यांनी केंद्राच्या नावाने शिमगा केला. शेतकरी, पूरग्रस्त यांच्याविषयी त्यांनी एक शब्दही काढला नाही. शिवसेनेला अचानक राम मंदिर आणि हिंदुत्व आठवत आहे. हे काहीतरी वेगळेच संकेत देत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती असावा लागतो, स्वातंत्र्य काळात तुम्ही कुठे होता? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, या दहा हजार कोटीमध्ये काय काय दिले? हे स्पष्ट केले नाही. रस्ते आणि धरण दुरुस्तीसाठीही यातूनच निधी दिला आहे अशी माहिती आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय दिले? हे एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!