मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे, असं सांगतानाच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. उद्धव ठाकरे हे बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
अजित पवारांनी स्टेटमेंट केलं पण मग मी पुरावे ठेवले ना, मग पार्टनरशिप मागे का घेतली? असा सवाल करतानाच अजित पवार यांनी जमवलेली माया उघड केली. 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. हे 1000 कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. यात 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची जाणीव झाली असती’
- ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी’ : संदीप देशपांडे
- ठरलं तर मगं…राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच!
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
