Share

आसाम विधानसभा निवडणूकीमध्ये आठवलेंचे १० उमेदवार रिंगणात

Published On: 

मुंबई : आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १० उमेदवार निवडणूक रिंगणात असून उद्या ३१ मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आसाम मध्ये प्रचार दौरा करणार आहेत अशी माहिती रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

आसाम मधील पाथरकांडी विधानसभा मतदारसंघात रिपाइं चे जयंत सिन्हा, सिलचर मतदारसंघात प्रसंत लष्कर, बिळाशीपुरा पूर्व मतदारसंघात प्रदीप रॉय, सारभोग मध्ये प्रकाश ब्रह्मा, भाबनिपुर मध्ये अनोवर उद्दीन अहमद, पटाचरकुची मध्ये कृष्णा मोनी दास, बघबोर मतदारसंघात रेजऊल करीम, चेंगा मध्ये नूरुल आलम, गुवाहाटी पूर्व मध्ये प्रणाबज्योति दास, गुवाहाटी पश्चिम मध्ये कल्याण शर्मा हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.

आसाम मध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १० उमेदवार स्वबळावर लढत असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे आधी अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी केली असून आसाम मधील गुवाहाटी मध्ये उद्या दि. ३१ मार्चला ना रामदास आठवले प्रचार दौरा करणार आहेत.

आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढत आहेत अशी माहिती रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!