Share

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात जोडला गेला ‘हा’ फिरकी गोलंदाज

Published On: 

नवी दिल्ली :  मोहाली  येथे होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाबरोबर माजी फिरकी गोलंदाज सैराज बहुतुले हे जोडले गेले आहेत  बहुतुले भारतीय संघाच्या सराव सेशन दरम्यान डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्याशी बोलताना दिसले.

सैराज बहुतुले यांच्याबद्दल बोलायचं झाल तर त्यांनी भारताकडून २ कसोटी आणि आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. त्यांना प्रशिक्षक पदाचा भरपूर अनुभव आहे. सध्या ते बेंगलोर येथील नॉशनल क्रिकेट अकॅडमी येथे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.

मागील महिन्यात वेस्ट इंडीज येथे झालेल्या १९ वर्षाखालील विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा देखील ते भाग होते. सध्या भारतीय संघात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक नसल्यामुळे बहुतुले हे भारतीय संघासाठी एक चांगला पर्याय असतील.

क्रिकबज बरोबर बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलेकी बहुतुले हे भारतीय संघाचे पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक राहणार नाहीत. सैराज बहुतुले यांच्या व्यतिरिक्त माजी प्रथम श्रेणी खेळाडू अपूर्व देसाई एनसीए ट्रेनर आनंद दाते हे ही भारतीय कसोटी संघाबरोबर जोडले गेले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!