नवी दिल्ली : रमजानच्या काळात दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये नमाज पठण करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने यावरून घुमजाव केले आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या नियमांनूसार सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
मरकजमध्ये नमाज पठणांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी दिल्ली वक्फ बोर्डाने दिल्ली हायकोर्टात केली आहे. त्यावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी पडताळणी करून दोनशे जणांची यादी तयार केली आहे. यातील २० जणांना नमाज पठणासाठी एकावेळी परवानगी दिली जाईल, असं केंद्र सरकारने हायकोर्टात सांगितले. त्यावरून कोर्टाने सरकारला फटकारले होते.
हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यातील हजारोंच्या गर्दीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून कोर्टाने केंद्राच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. धार्मिक ठिकाणांवर २० हून अधिक जणांच्या एकत्र येण्यावर सरकारने बंदी घातली आहे का? असा प्रश्न कोर्टाने केला. सर्व धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा संबंधी कार्यक्रमांच्या बंदीवर प्रतिज्ञापत्र दाखल करून सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश कोर्टाने दिले. २०० जणांची यादी तयार करणं अवघड काम आहे, असे वक्फ बोर्डाने कोर्टात सांगितले. मशिदीला संख्या निश्चित करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. कारण कुठल्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असे ठरवण्यात आलेले नाही. दोनशे जणांची यादी स्वाकारणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक : प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून किळसवाणं कृत्य करण्याची शिक्षा !
- आता गुजरामधील रिलायन्सच्या प्रकल्पातून राज्याला मिळणार अतिरीक्त ऑक्सिजन
- ‘मुलगी झाली हो’ म्हणत अख्ख्या गावात वाटली जिलेबी!
- अखेर राहुल गांधीं बंगालमध्ये प्रकटले ; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर घणाघात
- नांदेड जिल्ह्यामध्ये मोबाईल व्हॅनव्दारे लसीकरणासह कोरोनाची चाचणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

