Share

‘काँग्रेस झोलबाज, शिवसेना दगाबाज’ आशिष शेलारांचा घणाघात

Published On: 

मावळ : भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक होतील, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळ येथे आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केले आहे. मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. तर शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. दगाबाजी जरी स्थापन झालं असलं तरी ते विकास करतील असं वाटलं होतं, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!