Share

‘जर डर असेल तर राऊतांसारखा डराव डराव होतो’

Published On: 

मुंबई : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.

एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपातील नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे आमदार व नेते ऍड. आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. ‘राऊतांनी दमबाजी करू नये, आपल्या दामदमडीचा हिशोब द्यावा. त्यांच्या डंबाजिला भाजप घाबरणार नाही. सीबीआय, ईडी, यासारख्या तपास संथांवर दबावतंत्र वापरण्याचं घाणेरडं राजकारण शिवसेना करत आहे. शिवसेना नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकलीये. जर कर नसेल तर दर कशाला. आणि दर असेल तर मग असा डराव डराव होतो जो राऊतांनी केलाय’ अशी जळजळीत टीका शेलारांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!