Share

आशिष शेलार राज्यपालांसोबत पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ जुलैरोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. एक दिवसाच्या दौऱ्यात राज्यपाल तळिये व चिपळूणला भेट देणार आहेत. राज्यपाल कोश्यारीसोबत भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनाही पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे.

या दौऱ्यासाठी आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोबत प्रस्थान केले आहे. पुराचा फटका बसलेल्या कोकणातील महाड, तळये, चिपळूण या भागाचा पाहणी दौरा करून राज्यपाल आणि आशिष शेलार परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दरडग्रस्त तळीये, चिपळूण या भागात अजूनही मदतकार्य सुरु आहे. या भागातील नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे. तर राज्यातील पूरग्रस्तांना २०१९ च्या जीआरप्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. या अगोदर मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष्याच्या नेत्यांनी या भागाचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली आहे. आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी समवेत भाजप प्रवक्ते आशिष शेलार कोकण भागातील दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. याबात आशिष शेलार यांनी समाज माध्यमावर माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!