मुंबई: मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भाजपकडून या मागणीसाठी आझाद मैदानावर जोरदार आंदोलन सुरु आहे. मात्र यावेळी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आले.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळातील एका ‘लुच्चा’ मंत्र्याने आंतकवादी याकुब मेमन याला फाशी होऊ नये, अशी मागणी केली होती. त्या मंत्र्याचे नाव काय होते? असे आंदोलनात जमलेल्या लोकांना विचारले असता त्यांनी नवाब मलिक यांच्या नावाचा जयघोष केला. त्यामुळे आशिष शेलार नवाब मलिकांवर टीका केली का, अशी चर्चा रंगत आहेत.
LIVE from @BJP4Mumbai’s huge protest #NawabHataoDeshBachao at Azad Maidan, Mumbai !
Mumbaikars from every nook & corner of Mumbai have gathered massively.#Mumbai #Maharashtra #AzadMaidan https://t.co/UdDXoHIoom— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2022
दरम्यान आझाद मैदानावर भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असून राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा भाजपने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –


