Share

रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड केला; आ. संदिपान भुमरेंच्या भावाची एकाला मारहाण!

Published On: 

औरंगाबाद : रस्त्याच्या कामाबाबत झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याने पैठण येथील शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे(Sandipan Bhumre) यांच्या भावाने एकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रंजीत नरवडे(Ranjit Naravde) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे(Raju Bhumre) यांच्यासह आठ जणांवर याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित नरवडे यांना ज्या कारणामुळे मारहाण झाली ते कारण असे आहे. नरवडे यांनी रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार सर्वांसमोर आणला होता. याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार २०१८ मध्ये या रस्त्याचे काम झालेच नाही. मात्र तरीही या रस्त्याचे बोगस बिल लाटले गेले. या तक्रारीनंतरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र नरवडे यांनी तक्रार दाखल केल्याचा राग धरून संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रणजित नरवडे यांच्यासोबत भुमरे यांचे पारिवारिक संबंध असल्याचे समोर आले आहे. नरवडे हे संदिपान भुमरे यांचा मामाचा मुलगा आहे. त्यामुळे भुमरे यांनी आपल्या भावालाच मारहाण केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!