Share

मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी ठोस भुमिका घ्यावी, राजेंद्र दाते पाटील यांचे मत!

Published On: 

औरंगाबाद : आरक्षणाची मर्यादा वाढविल्याशिवाय मराठा समाजाला आणि देशातील इतर समाजाला न्याय मिळणार नाही. म्हणुन केंद्राने लोकसभा व राज्य सभा पटलावर प्रलंबित बील मंजुर करुन सर्वांनां न्याय द्यावा असे आवाहन करून जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील(Rajendra date patil) यांनी  घटनात्मक पर्याय दिला आहे. मराठा आरक्षणासोबत देशातील २६ पेक्षा जास्त राज्यातील नागरिकांना ५०% पेक्षा जास्त आरक्षण त्या त्या राज्यांनी दिलेले असल्यामुळे त्यांचे सुद्धा आरक्षण रद्द होण्याची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासोबत सर्वाना न्याय देण्यासाठी आणि राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सर्वांना सामील करून घेण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आवश्यक असलेले विधेयक ( बील )लोकसभा तसेच राज्यसभेच्या पटलावर आहे. ते विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने याच अधिवेशनात विशेष चर्चा घडवून आणणे न्यायपूर्ण ठरणार असुन देशातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी केंद्र सरकार कडे जोरकस मागणी करावी, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे मुख्य हस्तक्षेप याचिका  दाखल करणारे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी घेतली आहे.

राज्य शासनाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करण्याबाबत कायदेशीर सल्ला प्राप्त करून घेतांना आता परत नव्याने सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षा केल्या प्रमाणे राज्य मागास वर्ग आयोग स्थापना करण्या बाबत नियोजन करून वेळेचे व्यवस्थान करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द ठरवले आहे. या विषयी त्यांचे सविस्तर पणे मांडताना दाते पाटील यांचे म्हणणे आहे की, जर ५०% पेक्षा जास्त आरक्षण दिले गेले तर ते वाईट आहे का ? काही समाजांना शिक्षण घेण्याची संधी कधीच मिळाली नाही आणि आपण त्यांच्यासाठी जागा आरक्षित केल्या आहेत, त्यात काही गैर आहे का?   असा सवाल त्यांनी राज्य सरकारला उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!