Share

ओबीसी आरक्षण: राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

Published On: 

मुंबई: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अध्यदेशाला सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्य सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात गेले आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी दिल्ली येथे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. निवडणुका जवळ आलेल्या असताना ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र ही तांत्रिक बाब आहे यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे आणि यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आता १३ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!