Share

‘भविष्यात नळाद्वारे दारू…’; आशिष शेलारांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई: राज्यात आता किराणा दुकानांमध्ये वाईन (Wine) मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. त्यामुळे आता वाईन घेणं अगदी सोपं झालं आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र आता यावरुन भाजप आक्रमक झाली असल्याचे बघायला मिळत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील याचा निषेध केला आहे. ठाकरे सरकारचे मद्य प्रेम यापूर्वी वारंवार दिसून आले होतेच…आता किराणा मालाच्या दुकानात दारु विकण्याची परवानगी दिली आहे. पब, पेग, पार्टी आणि दारु याबाबत “अती संवेदनशील” असणाऱ्या ठाकरे सरकारने भविष्यात नळा व्दारे 24×7 घरोघरी दारु उपलब्ध करुन दिली तरी नवल वाटू नये, असा खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!