औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत समाजातील गरीब, जोखमीच्या व दारिद्रय रेषेखालील लोकांना परिणामकारक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी, आरोग्य व्यवस्था बळकटीकरणापासून ते संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या निधीचा वापर, लसीकरण, अंधत्व निवारण, मलेरिया, कुष्ठरोग, मौखिक आजार निवारण, असंसर्गीक आजारावर शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळावी, आरोग्यसेवा यंत्रणा दर्जेदार बनविण्यासाठी खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी गुरुवारी (दि.२७) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व समन्वयकांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रम व योजनांचा लाभ मिळावा तसेच आरोग्य विषयक सेवा तत्परतेने मिळावी याकरिता कार्यक्रमांची व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागातील वयोवृध्दांना डोळांचे आजारावर शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी तीन दिवस औरंगाबादेत मुक्काम करावा लागतो.
त्यासाठी वयोवृध्दांना व नातेवाईकांना अनेक समस्या उद्भवत असल्याने डोळ्यांचा विविध आजारावरील शस्त्रक्रिया तालुकास्तरावरच व्हावे यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अभियंता आणि तंत्रज्ञांसाठी स्पेशल निओनेटल केअर युनिटशी निगडीत उपकरणे हाताळणी व उपयोग कर्त्यांनी देखभाल व दुरुस्तीकरिता प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, याविषयी सविस्तर चर्चा केली. आरोग्यसेवांचे सामाजिकीकरण करुन ती समाजाच्या सहभागाने राबवावे तसेच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्वरीत सोडवून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग ; भारतीय क्रिकेट संघाचे पर्दापण
महाराणा प्रतापांचा पुतळा बसवतांना मी पुढे असेल; अब्दुल सत्तारांनी जलील यांना खडसावले!
“ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात”
शिवसेना-भाजप युतीबाबत उतावीळ सत्तारांचे आणखी एक विधान म्हणाले; नितीन गडकरीच बांधू शकतात पूल..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

