Share

अखेर प्रस्ताव मंजूर; जनरल स्टोअरमध्ये आता वाईन उपलब्ध

Published On: 

मुंबई: राज्यात आता किराणा दुकानांमध्ये वाईन (Wine) मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. त्यामुळे आता वाईन घेणं अगदी सोपं झालं आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र आता यावरुन वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यासंबंधीची माहिती दिली. राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार एक हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!