औरंगाबाद: नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर औरंगाबाद महानगर पालिकेने भर देण्याची सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांनी दिली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स, जीआयएस आणि नागरी सुविधा केंद्राच्या उद्घाटन आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पारदर्शी, जलद व कार्यक्षम सुविधा पुरवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीने ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवले आहे. महानगरपालिकेचे सर्व कामकाज आता ई-गव्हर्नन्सच्या या माध्यमातून डिजिटल होणार आहे. आत्तापर्यंत नागरिकांना मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवा जसे की मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणे, जन्म आणि मृत्यू व लग्नाचे प्रमाणपत्र प्राप्त करणे ह्यांचासाठी मनपा कार्यालयांना भेट द्यावी लागत होती. स्मार्ट सिटीच्या इ गव्हर्नन्स प्रकल्पामुळे आता हे सगळे काम डिजिटल होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाईल वर ऑनलाइन पद्धतीद्वारे सगळ्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
त्याचबरोबर जीआयएस प्रकल्पांतर्गत पूर्ण शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून ३०० विविध स्तरांचा नकाशा तयार करण्यात येईल. ज्याद्वारे प्रत्येक मालमत्तेचा एक युनिक जीआयएसआयडी तयार होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जीआर प्रमाणे स्मार्ट सिटीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलत कार्यालयासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-व्हेकल्स घेतले आहेत. या तीनही महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या कार्यालयात ठाकरे ह्यांचा हस्ते करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग ; भारतीय क्रिकेट संघाचे पर्दापण
महाराणा प्रतापांचा पुतळा बसवतांना मी पुढे असेल; अब्दुल सत्तारांनी जलील यांना खडसावले!
“ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात”
शिवसेना-भाजप युतीबाबत उतावीळ सत्तारांचे आणखी एक विधान म्हणाले; नितीन गडकरीच बांधू शकतात पूल..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

