मुंबई: राज्यात आता किराणा दुकानांमध्ये वाईन (Wine) मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. त्यामुळे आता वाईन घेणं अगदी सोपं झालं आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र आता यावरुन भाजप आक्रमक झाली असल्याचे बघायला मिळत आहे.
शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही.
सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच❗️
महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे❓
सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी ‼️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2022
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त ❗️
दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️
महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय ❗️
आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2022
पुढे फडणवीस यांनी आणखी एक ट्विट केले आहे. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त. दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू!! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यानं सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळावी; खासदार जलील यांनी घेतली बैठक!
-
औरंगाबादेत डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहनाची गरज-आदित्य ठाकरे
-
अभिनेत्री मौनी रॉय-सूरज नांबियार यांनी बांधली रेशमीगठ, पहा नववधूच्या दिलखेचक अदा
-
निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा दंगली घडवण्याचा डाव; कॉंग्रेसचा आरोप

