मुंबई : ‘शादी में जरूर आना’ चित्रपटाद्वारे अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यानंतर बरेच चित्रपट त्याच्या करिअरला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरले. नुकताच राजकुमारने सोशल मीडियावर पत्नी पत्रलेखासोबत (wife Patralekha) एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, मात्र राजकुमारने तो फोटो नुकतचं डिलीट केलं आहे.
दरम्यान अभिनेता राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram account) एका फोटो शेअर केला होता. हा एक मिरर सेल्फी होता. या फोटोमध्ये राजकुमार त्याची पत्नी पत्रलेखासोबत दिसत आहे. पत्रलेखा ही आरश्यासमोर बसली असून राजकुमार तिचा फोटो काढत असल्याचे या फोटोत दिसत आहे.
मात्र मिरर सेल्फीचा हा फोटो शेअर केल्यानंतर राजकुमार रावला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल (Trolled) करण्यास सुरूवात केली. तो फोटो चाहत्यांना योग्य न वाटल्याने त्यास कमेंटद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावरून तो फोटो डिलीट ही केल आहे.

अभिनेता राजकुमार आणि पत्रलेखा ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. नुकतच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते लग्न बंधनात (Married) अडकले आहे. आता दोघें ही सोशल मीडियाच्या माध्यमाने चाहत्यांशी संवाद साधत असतात.
महत्वाच्या बातम्या:
अभिनेत्री मौनी रॉय-सूरज नांबियार यांनी बांधली रेशमीगठ, पहा नववधूच्या दिलखेचक अदा
निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा दंगली घडवण्याचा डाव; कॉंग्रेसचा आरोप
तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग ; भारतीय क्रिकेट संघाचे पर्दापण
महाराणा प्रतापांचा पुतळा बसवतांना मी पुढे असेल; अब्दुल सत्तारांनी जलील यांना खडसावले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

