मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन राज्यात आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असे स्पष्ट दिसत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण हा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात वादाचा विषय ठरला आहे. याच मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे.
‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार बोलत होते.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा खोचक सवालही शेलार यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. राज्य सरकारच्या अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/qhUU14Ae9O
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 16, 2021
ओबीसी समाजाचे मागासलेपण सिध्द करणारी इंपेरिकल डाटा आणि जनगणनेची आकडेवारी यामध्ये फरक आहे. पण आंब्याच्या झाडासमोर उभे राहून चिंच द्या, अशी मागणी करण्यारसारखे काम या सरकारने केले आहे. छगन भुजबळ, विजय वड्डेट्टीवार, नाना पटोले यांनी एवढे दिवस हेच केले आहे. स्वत:चा नाकर्तेपणा दुसऱ्यावर आरोप करून झाकला जात नाही, असा जोरदार टोला आशिष शेलार यांनी लगवाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्ते जमिनीवर, राज ठाकरे खुर्चीवर बसले जेवायला?, मनसेने सांगितलं कारण
- एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे सरकारची तयारी सुरु!
- ‘औरंगाबाद-वेरूळ’ महोत्सवाऐवजी आता होणार अजिंठा महोत्सव; कलाप्रेमींच्या उत्साहाला उधाण!
- ‘तो’ अधिकार राज्यपलांचाच; अजित पवारांनी सांगितला लोकशाहीचा धडा
- ‘बैलगाडा शर्यत आमच्या सरकारमुळेच…’, देवेंद्र फडणवीसांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

