🕒 1 min read
मुंबई: बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये किशन शोचा स्टार ठरला होता. कारण दोन दिवसीय ऑक्शनमध्ये किशन सर्वात महागडा क्रिकेटर ठरला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला तब्बल १५. २५ कोटी रुपयात संघात आणले. मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग असलेल्या किशनला फ्रँचायझीने रिटेन केले नव्हते, परंतु तो संघात परत येईल याची खात्री करण्यासाठी त्यांनी संपूर्ण प्रयत्न केले.
आयपीएल ऑक्शनमध्ये चढ्या किमतीत खरेदी केल्यावर खेळाडू सहसा आनंदी असतात, मात्र ईशान (ishan kishan) चिंतीत असल्याचे त्याने नुकतेच सांगितले आहे. “मला माहित होते की MI माझ्यासाठी जाईल. ती काळजीची गोष्ट नव्हती. टेन्शन या गोष्टीचा होता जेव्हा किंमत वाढत होती. कारण MI ला उर्वरित संघ तयार करण्यासाठी पैसे वाचवणे आवश्यक होते. हे फक्त माझ्यासाठी नव्हते. एका मिनिटासाठी माझ्या हृदयाचा ठोकाचं चुकला होता.”
नुकतेच T20I मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता आणि श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिकेत तो खेळणार आहे. ईशानने तिन्ही सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली परंतु धावा करण्यात तो अयशस्वी ठरला. संघाला त्याच्याकडून मोठ्या धावांच्या अपेक्षा आहेत. त्याच्याकडे बिग हिटर म्हणूनही बघितले जाते. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात त्याच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी असेल.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर?; सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
- कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती
- “इतर लीग्स पीएसएल सारखी रंजक नाहीत” ; मायकल वॉनचा दावा
- ईडीचा पेपर फुटलाच कसा?; खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
- ‘केंद्र सरकारकडे न्याय मागणार’ – सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
