🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तान सुपर लीग (PSL) सामन्यादरम्यान लाहोर कलंदर संघाचा सहकारी खेळाडू कामरान गुलामला थप्पड मारल्या प्रकरणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला फटकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे लाहोर कलंदर आणि पेशवर झाल्मी यांच्यातील सामन्यादरम्यान, एक फलंदाज बाद झाल्यानंतर रौफने गुलामला थप्पड मारली होती.
रौफने गुलामाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) मधील एका स्रोताने उघड केले की मैदानावरील पंचांपैकी कोणीही सामनाधिकारी अली नक्वी यांना या घटनेची माहिती दिली नाही,त्यांनी स्वतः फटकारले. मात्र सामन्यात नंतर रौफ मैदानावर गुलामला मिठी मारताना दिसला ज्यात दोन खेळाडूंमधील गोष्टी स्पष्ट असल्याचे दिसले.
कानाखाली मारल्याच्या या घटनेवर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला “मला वाटत नाही की ही एक घटना होती जी जग पाहत असलेल्या सामन्यात घडली पाहिजे होती, जरी हरिसला असे करायचे नव्हते तरीही ती छाप सोडली गेली आहे. मला आशा आहे की हरिस या घटनेतून शिकेल , कारण ती घटना वाईट होती आणि भविष्यात त्याने याची पुनरावृत्ती केल्यास तो मोठ्या संकटात सापडेल.”
महत्वाच्या बातम्या
- “त्याक्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता”; ईशान किशनने केला गौप्यस्फोट
- नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर?; सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
- कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती
- “इतर लीग्स पीएसएल सारखी रंजक नाहीत” ; मायकल वॉनचा दावा
- ईडीचा पेपर फुटलाच कसा?; खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल


