Share

“…नंतर माजी सैनिकांनी अदानी-अंबानींच्या घराबाहेर नोकरीसाठी उभे राहावे का?”, AIMIM चा मोदींना सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशात सध्या केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. देशभरात या योजनेविरोधात तरुणांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. १३ राज्यांत तरुण याविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. यावरच आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी थेट पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) सवाल केला आहे.

“चार वर्षे देशाचे रक्षण केल्यानंतर या तरुण माजी सैनिकांनी अदानी आणि अंबानींच्या घराबाहेर नोकरीच्या रांगेत उभे राहावे किंवा भाजपच्या कार्यालयाबाहेर चौकीदारी करावी असे तुम्हाला का वाटते मोदी जी?”, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

हे सरकार तरुणांच्या भवितव्याशी आणि सैन्याच्या ताकदीशी खेळून काही हजार कोटी रुपये वाचवेल, पण त्याचा फायदा लष्कराला किंवा गरीब शेतकऱ्याला कधीच होणार नाही, फायदा त्या दोन क्रोनी व्यावसायिकांना होणार आहे. मोदीजींनी नोटाबंदीनंतर 50 दिवस मागितले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. लॉकडाऊनचा परिणामही आपण सर्वांनी पाहिला आहे. पण सरकारलाच आपल्या चुकांची पुनरावृत्ती करायची आहे. देशातील तरुणांना मारायचे आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत, तुमची आणि तुमच्यासोबत वारंवार मुदतवाढ घेणारे निवृत्त आयएएस अधिकारी नाही. तुम्ही या तरुणाचा आवाज ऐका आणि त्यांच्या मागणीचे पालन करा. ही अग्निवीर योजना तात्काळ मागे घ्या. अशी मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!