Share

उद्योजक आनंद महिंद्रा यांची अग्नीवीरांसाठी मोठी घोषणा, म्हणाले…

Published On: 

मुंबई : लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेवरून देशात सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरती अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आता यामध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोमवारी प्रशिक्षित आणि पात्र अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “अग्निपथ योजनेमुळे झालेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आहे. मागच्या वर्षी ज्यावेळी ही योजना आणली गेली तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुन्हा सांगतो की अग्निवीरांची शिस्त आणि कौशल्य त्यांना रोजगारक्षम बनवेल. पुढे त्यांनी लिहिले महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित आणि सक्षम तरुणांना येथे नोकरीची संधी देईल.”

दरम्यान, अग्निपथ योजनेला सुरु असलेल्या विरोधामुळे अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. पूर्व रेल्वेने रविवारी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना जोडणाऱ्या २९ गाड्या रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वांद्रे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथील ७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!