Share

Legislative Council elections : निवडणुकीपूर्वी भाजप उमेदवाराचे गणरायाला साकडे; ट्वीट करत म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज निवडणुकीपूर्वीच भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी गणरायाला साकडे घालत दर्शन घेतले आहे.

ॐ गं गणपतये नमः सिद्धिविनायका चरणी सपत्निक लीन होऊन, बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करेल, महाराष्ट्रावर आलेली इडा पिडा दूर करेल. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.”, असे ट्वीट प्रसाद लाड यांनी केले आहे. 

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापर आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात झाली आहे तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!