मुंबई: आज (२० जून) विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरले आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”, असे सूचक ट्वीट खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. आता या ट्वीटमधील भाई म्हणजे भाई जगताप आणि मिशीवाला मावळा म्हणजे सेनेचे सचिन अहिर आहे काय? अशा चर्चा आता रंगत आहेत.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत. कॉंग्रेसला दुसऱ्या जागेसाठी किमान ८ मते आवश्यक आहेत. भाजपला स्वतःचे संख्याबळ आणि सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचव्या जागेसाठी १८ मतांची गरज आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात होईल, तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही थरापर्यंत…”, संजय राऊतांचा टोला
- Legislative Council elections : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी-भाजपमध्ये लढत
- IND vs SA : भारताचं स्वप्न यावेळीही राहील अपूर्ण; निर्णायक सामना पावसामुळे रद्द
- IND vs SA : निर्णायक सामन्यात पावसाची पुन्हा एकदा एंट्री, खेळ थांबवला!
- अग्निपथ योजनेवर रवी किशन यांचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाले…


