Share

“…हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते?”, संजय राऊतांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (२० जून) विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरले आहेत. त्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची संधी नाकारल्याने भाजपवर निशाणा साधला आहे.

आयपीएल सामन्यांत गुजरातचा संघ ज्या पद्धतीने जिंकवून आणला (असे भाजपाचेच डॉ. सुब्रमण्यम स्वामी सांगतात) तसेच घपले करून भाजपा या निवडणुका जिंकू पाहत आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते ‘दिल्ली’तील यंत्रणांचा वापर करून बाद करण्याची कलाबाजी भाजपाने दाखवून दिली आहेच, पण अनिल देशमुख, नवाब मलिक या विधानसभा सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये यासाठीही पडद्यामागून करामती केल्याच. नवाब मलिक व देशमुखांना राज्यसभेत मतदानाचा हक्क न्यायालयाने नाकारला. आता विधान परिषद निवडणुकीतही या दोन विधानसभा सदस्यांना मतदानाचा हक्क नाकारला. हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मलिक व देशमुख यांना बनावट पद्धतीने आरोपी केले व केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली. त्यांच्यावरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत व प्रत्यक्ष खटलाही सुरू झालेला नाही. कोणत्याही न्यायालयाने त्यांना गुन्हेगार ठरवून कोणतीही शिक्षा ठोठावलेली नाही. त्यांची आमदारकी अद्याप शाबूत असताना त्यांना मतदानाचा हक्क नाकारला हा घटनेचा, लोकशाहीचा खून आहे. कलम ३०२ खाली हत्येचा आरोप असलेल्या, फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या कैद्यालाही तुरुंगातून मतदानाचा अधिकार कायदा अधिनियम, १९५१ प्रमाणे आहे. मलिक, देशमुख यांना पोलीस बंदोबस्तात विधान भवनात एक तासासाठी आणून मतदान करून घेता आले असते, पण देशमुख, मलिक हे विधान भवनातून भूमिगत होतील किंवा पळून जातील असे भय ‘ईडी’ला वाटले असेल. हा मूर्खपणाच आहे! अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!