Share

Dipali Syed VS Raj Thackeray : “राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील”, दिपाली सय्यद यांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Syed) नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. शिवसेनेचा एक खंबीर आवाज म्हणून सध्या त्या प्रचलित होत आहेत. आता त्यांनी विधान परिषद निवडणूकवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे.”, असा खोचक टोला दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत लगावला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यात आता झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने रणनीती आखून मोठा विजय संपादित केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माणसे जमवण्यात यश आल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. मविआ नेत्यांकडून मनसे भाजपची टीम असल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो.

दरम्यान आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उभे राहिले आहेत. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात झाली आहे तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!