नांदेड : देगलूर-बिलोली मतदार संघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुभाष साबणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे उमेदवार आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे अंतापूरकरांच्या प्रचारासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
भाजपला महाराष्ट्रात सत्ता नाही त्यामुळे जिकडे जागा रिकामी झाली तिकडं नाक खुपसायचं सुरु आहे. खरं तर भाजपने विचार करायला हवा होता की, रावसाहेब अंतापूरकरांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली आहे. पक्षाचा विषय येतो पण कधीतरी पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. एखाद्या घरातील कर्ता माणूस गेलाय. त्याच्या घरातला मुलगा उभा आहे. सहानुभूती म्हणून तरी आपण विचार केला पाहिजे पण भाजपला ती सुद्धा दया आली नाही आणि विरोधात माणूस उभा केला, असं म्हणत भाजपवर टीका केली आहे.
भाजप हा तर उपऱ्यांचा पक्ष आहे. pic.twitter.com/98X6W1MiCJ
— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 25, 2021
स्वत:कडे माणसं शिल्लक नाहीत म्हणून बाहेरुन माणूस आणला आणि उभा केला. हा तर उपऱ्यांचा पक्ष झाला. बाहेरची माणसं ओढायची तोडायची फोडायची आणि आपलं सरकार कसं येईल या भ्रमात ही मंडळी आजूनही मी येणार मी येणार हे स्वप्न अजूनही कायम डोक्यात ठेवलं आहे. आणि संपूर्ण नांदेड पालथं उलथं घालत त्या मतदार संघात फिरण्याचं काम सुरु झालं आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला आहे.
भाजपवाल्यांना माझा प्रश्न आहे, ज्यावेळी आरक्षणाचे अधिकार राज्यांना देण्याची प्रक्रिया संसदेत सुरू होती, तेव्हा आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याचे काम भाजपने का केले नाही? भाजपने जाणिवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला जेणेकरुन मराठा समाजाचा राजकीय गैरवापर करता येईल! pic.twitter.com/eI5OjQxdPD
— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागतंय, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे- दिलीप वळसे पाटील
- माझ्या वडिलांचे नाव दाऊद नाही तर ज्ञानेश्वर; समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

