🕒 1 min read
यवतमाळ : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १ सप्टेंबर रोजी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले होते. आता यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
शेतकर्यांच्या खात्यात पाच दिवसात मदत निधी टाकू ही राज्य सरकारची घोषणा फोल ठरली आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, असे टिकास्त्र अंबादास दानवे यांनी सोडले. शेतकरी आत्महत्येमागे प्रशासनासह राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. शासनाच्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहचत नाही, असा आरोप दानवे यांनी केला. सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत असल्याने कुटुंबियांच्या भेटी घेवून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी देखील करणार आहे.
अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम त्यांच्या खात्यात टाकली जाईल. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत,असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. यावेळी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कृषिमंत्र्यांनी अमरावतीतील धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावात एक दिवसापूर्वी येऊन आदिवासी शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी बुधवारी रात्री मुक्काम केला होता. त्यांच्या घरी अस्सल गावरान भोजनाचा आस्वाद घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil । दिल्लीत अजित पवारांना बोलू दिलं नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले….
- Sharad Pawar | मोदींविरोधात २०२४ च्या निवडणुकीत कोणता चेहरा असेल? ; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
- Bhaskar Jadhav | “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील”
- Raj Thackeray | “होय! विदर्भाकडे माझं दुर्लक्ष झालं, मात्र…”, राज ठाकरेंनी दिली कबुली
- Sharad Pawar । शिंदे साहेबांनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
