🕒 1 min read
मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येकीची कसून तपासणी करण्यात येते. तरीसुद्धा आत दारूच्या बाटल्या गेल्या कशा हा सर्वांना प्रश्न पडला आहे. हे दारू पिणारे कोण असावे हा सुद्धा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
दारुच्या बाटल्यांचा हा खच दिसून आल्याने मंत्रालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.मंत्रालयात कडक बंदोबस्त आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत असे असताना दारुच्या बाटल्या आल्या तरी कशा हा प्रश्न उपस्थीत झाला आहे.दरम्यान या विषयी बातमी पसरल्यावर लगेचच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन दारूचा खच उचलायला सुरुवात केली. याप्रकरणी चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच –
आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परीस्थिती @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @SMungantiwar @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/9M1Ga7dL2V— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 10, 2021
दरम्यान, मंत्रालयातील उपहारगृहाच्या शेजारी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आल्याने आता सरकार टीका होऊ लागली आहे. भाजपनेत्या चित्रा वाघ आणि निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच – आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परीस्थिती असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री गेले दीड वर्ष मंत्रालयात न गेल्याने अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर बोलावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनीसुद्धा याच मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर काय अगरबत्तीचा स्टॉक मिळणार?? मंत्रालयात कुठल्या स्तराचं काम चालू आहे यावरून लक्षात येते. सरकारची भीती मंत्रालयात सुद्धा राहिलेली नाही, आता हे सरकार फक्त चौकशीचे आदेश देणार आणि माहिती काढणार कोण कुठल्या ब्रँडची पितो अशी टीका त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाहीत, थोडी वाट पहावी लागेल’- राजेश टोपे
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
