मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं. मेट्रो कारशेडचा मुद्दा देखील त्यांनी मांडला. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून परत एकदा राजकारण चर्चेत येणार आहे. त्यामुळे माझा राग मुंबईवर काढू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
माझा चेहरा आज पहिल्यांदा तुम्हाला पडलेला दिसत असेल. मला दुःख झालं आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. कांजुरचा प्रस्ताव आहे त्यात आमचा काही अहंकार नाही. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
मात्र एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरे संदर्भातील निर्णय बदलला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबईतल्या आरे इथं होणाऱ्या मेट्रो कारशेडचा बद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.
मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत होता. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना कारशेड आरेमध्ये होणार असा निर्णय झाला होता. या गोष्टीला त्यावेळी शिवसनेने कडाडून विरोध केला होता. शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर कारशेड कांजूर मार्गे हलवलं. मात्र आता एकनाथ शिंदे सह फडणवीसांचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा मेट्रो कारशेड आरे मध्येच करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव देखील मांडला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

