मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीवर रोखठोक भाष्य केलं. शिवसेना-भाजप ही 25-30 वर्षांची युती तुटली आणि महाविकास आघाडी बनली. आता ही आघाडी किती वर्ष टिकेल या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
यावेळी उत्तर देताना ते म्हणाले कि, ‘भाजपशी 25-30 वर्ष युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. युती किंवा आघाडी कशासाठी होते?’ त्यानंतर युती 30 वर्ष टिकली, मग आघाडी किती टिकणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल.’ असे मोठे विधान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
पुन्हा भाजप-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात तर या अफवाच आहेत का?, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो.आणि असेच एकत्र राहणार आहोत.’ असे ते यावेळी म्ज्णले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला बाजूला टाकलं जातं, महत्वाच्या निर्णयांतून बेदखल केलं जातं, या प्रकारचं असमाधान यापूर्वीही या पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी व्यक्त केलं आहे. पण गेले काही दिवस कॉंग्रेसच्या नेत्यांकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक पवित्रा जाहीरपणे घेतलेला पाहायला मिळतोय.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’


