Share

‘मी भाजपचा खासदार असल्याने माझ्यामागे कधीही ईडी लागणार नाही’, संजयकाका पाटील यांचा खळबळजनक दावा

Published On: 

🕒 1 min read

सांगली : भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सक्तवसुली संचलनालय अर्थातच ईडीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चेत आले. ही चर्चा थांबत न थांबते तोवर सांगलीतील भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी ईडीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘माझ्यामागे कधीच ईडी लागणार नाही. कारण मी भाजप खासदार आहे. हे मी जाहीरपणे बोलतो आहे. हवे तर रेकॉर्ड करुन घ्या’ असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

सांगलीच्या विटामध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन होते. या कार्यक्रमादरम्यान संजयकाका पाटील बोलत होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्यवरून बोलताना पाटील म्हणाले, ‘मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही.’ तसंच आम्हाला लोकांसमोर दिखावा करावा लागतो. कर्ज काढून 40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात, असंही संजयकाका पाटील म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, विटामधील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, अशोकराव गायकवाडही उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. रोजच्या रोज छाप्यांच्या व समन्सच्या बातम्या येत आहेत. बहुतेक सर्व कारवाया केवळ महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजपशी संबंधित कोणालाही समन्स धाडलं गेल्याचं किंवा त्यांची चौकशी झाल्याचं गेल्या दीड वर्षांत क्वचितच पाहायला मिळालं आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष सातत्यानं हा आरोप करत आहेत. हर्षवर्धन पाटील आणि त्यानंतर संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना एकप्रकारे बळकटी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!