Share

अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील- बिपिन रावत

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील अशी चिंता चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे, असेही रावत यावेळी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना रावत म्हणाले की, ‘अफगाणिस्तानमध्ये सध्या जे घडत आहे त्याचे परिणाम जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसू शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला त्यासाठी तयार राहायला लागेल. आपल्या सीमा बंद करा, देखरेख आणि टेहाळणी महत्त्वाची बाब आहे. बाहेरून देशात कोण येतंय याकडे आपली नजर असली पाहिजे. येणाऱ्यांची तपासणी करायला हवी.’ तसेच सामान्य नागरिक आणि पर्यटकांना या कडेकोट तपासणीचा त्रास होईल. मात्र, हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्यांना समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नागरिकाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जागृक केलं पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही, आपल्यालाच आपलं स्वतःचं, आपल्या लोकांचं आणि आपल्या संपत्तीचं संरक्षण करावं लागेल. देशाची अंतर्गत सुरक्षा आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. याला तोंड देण्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रशिक्षित करावं लागेल,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’जर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं/तिचं कर्तव्य समजले तर आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू. नागरिकांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावलं तर आपल्याला या परिस्थितीचा सामना करता येईल. तुमच्या शेजारी कोण लोक येऊन राहतात याविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे.’ तसेच आपण सतर्क असलो तर कोणताही दहशतवादी आपल्या शेजारी येऊन राहू शकत नाही. कुणालाही काहीही संशयास्पद वाटलं तर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे. तसेच त्याविषयी पोलिसांना माहिती दिली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!