🕒 1 min read
वाराणसी : वाराणसी येथील मेहंदी गंज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (२३ ऑक्टो.)पाहणी केली. यावेळी समाजवादी पक्ष हा आगामी विधानसभा निवडणुकीतला भाजपाचा मुख्य विरोधक असल्याचे योगी म्हणाले. फक्त एवढेच नाही तर त्यांनी महाभारताचा कलयुग अवतार असे म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला.
यावेळी विरोधी पक्षावर टीकास्त्रांचा वर्षाव करत ते म्हणाले की,’अशा ‘राम-द्रोहींनी’ केवळ श्रद्धेलाच हानी पोहोचवली नाही तर त्यांच्या सरकारच्या काळात सामाजिक जडणघडण बिघडले, विकासाला हानी पोहोचली आणि राज्याला दंगलीच्या आगीत ढकलले.’ तसेच जे प्रभू रामाचे हितचिंतक नाहीत ते तुमचे हितचिंतक कधीच होऊ शकत नाहीत,’ असेही योगी म्हणाले.
दरम्यान, भाजपाने आयोजित केलेल्या विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक पतिनिधी संमेलनाला संबोधित करताना योगी म्हणाले की,’दहशतवाद्यांचे संरक्षण करणार्या, दंगलखोरांना आलिंगन देणाऱ्या राम-द्रोहींपासून अंतर राखणे तुमच्या वर्तमानासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी चांगले ठरेल.’
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


