🕒 1 min read
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिली होती. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.
शेतकरी आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये सुरू असलेली बैठक काल तोडग्याविना संपली आहे. या बैठकीत कोणताही तोडगा काढण्यात यश आले नाही.नवीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना अपयशी ठरताना दिसत आहे. तर देशाचे गृहमंत्री यांनी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी आतंकवादी म्हंटले होते. यावरूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणता तेव्हा शेतकऱ्यांचे मुल जे सीमेवर लढत आहेत त्यांच्या मनाला काय वाटत असेल असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
तर आज देशाला ठरवाव लागणार आहे आपण शेतकऱ्यांसोबत आहोत की त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सोबत आहोत अस अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. आपण सगळ्यांनी या देशभक्त शेतकऱ्यांना साथ द्यायला हवी असे आवाहन केजरीवाल यांनी देशवासियांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘…तोपर्यंत मराठा आरक्षणाला चालना मिळणार नाही’
‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही; राम शिंदेंना गाढा विश्वास
‘वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार’
बॉलिवूडचा दर्जा कोणीही संपवू शकत नाही, नवाब मलिकांची योगींवर टीका!
कट्टर राजकीय विरोधक कुल-थोरातांमध्ये ‘चाय पे चर्चा’ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

