Share

#Article370 : आजचा दिवस ऐतिहासिक; आदित्य ठाकरेंकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

या निर्णयावर भाष्य करताना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ३७० कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेल’ असं विधान केले आहे.

तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख नव्या उभारणीसाठी मी प्रार्थना करतो. त्या राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. राज्यात शांतता, प्रगती आणि भरभराट होईल. वर्षोनुवर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याच उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असंही विधान केले आहे.

#Article370 : पीडीपीच्या दोन खासदारांनी केला देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न

#Article370 : फटाक्यांची आतिषबाजी करत मुंबईत शिवसेनाचा जल्लोष

#Article370 : आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!