Share

#Article370 : आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी ३७० कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. त्यानुसार कलम ३७० मधील काही कलमं वगळण्यात आली आहेत, असं अमित शाह यांनी संसदेत सांगितलं आहे. तसेच अमित शहांच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.

याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केले आहे. तसेच सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याच म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही सरकारच्या निर्णयाच स्वागत केले आहे. तासेक हाजचा दिवस हा ऐतिहासिक आहे असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच जे विरोध करत आहेत त्यांनीच काश्मीरचे शोषण केले असंही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या घडामोडीनंतर शिवसेनेने जल्लोष सुरु केला आहे. मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर ढोल ताश्याच्या गजरात तसेच फटाके फोडत शिवसैनिकांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत हातात तिरंगा घेत भारत माता कि जय च्या घोषणा देत आनद साजरा केला.

#जम्मू काश्मीर : आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील ‘काळा दिवस’ : मेहबूबा मुफ्ती

#Article370 : पीडीपीच्या दोन खासदारांनी केला देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न

 

काश्मीरला आज वाजपेयींची उणीव जाणवते : मेहबुबा मुफ्ती

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!