टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.
Resolution revoking Article 370 from J&K moved in Rajya Sabha. pic.twitter.com/ayUAqJdb6o
— ANI (@ANI) August 5, 2019
कलम ३७० हटवले गेल्यामुळे जम्मू-काश्मीर आता राज्य राहिले नाही. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश होईल. लडाखला विना विधेयकाचे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे.याविषयी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे अस त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निर्णयावरून हे कलम हटवणे हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पीडीपीच्या दोन खासदारांनी चक्क देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न केला आहे. या खासदारांच्या कृत्यामुळे पीडीपीचा खरा चेहरा समोर आला असून आता पीडीपीवर चौफेर टीका होऊ लागली आहे.
दरम्यान,या घडामोडीनंतर शिवसेनेने जल्लोष सुरु केला आहे. मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर ढोल ताश्याच्या गजरात तसेच फटके फोडत शिवसैनिकांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत हातात तिरंगा घेत भारत माता कि जय च्या घोषणा देत आनद साजरा केला.
महत्वाच्या बातम्या
35 अ हटवल्यास देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, आंबेडकरांचा इशारा
370 कलम हटविण्याचा प्रस्ताव सादर करताच कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचा थयथयाट
ही तर काँग्रेसची आत्महत्या – स्वामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

