मुंबई : 7 फेब्रुवारीच्या रात्री पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावरून आक्रमक रूप धारण केले आहे.भाजपकडून संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. राठोड यांना पदावरून हटवा ही मागणी जोर धरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर दबाव वाढत असल्याचे दिसून येतंय.
दरम्यान,महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.या अधिवेशनात राठोड यांचा मुद्दा राज्य सरकारसाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरेल असी शक्यता आहे. संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे स्पष्ट आहे.संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.
राजकारणातील जाणकार लोकांच्या मतानुसार ठाकरे यांनी राठोड यांचा सुरुवातीलाच राजीनामा घेतला असता तर सध्या सुरु असलेला तमाशा झाला नसता.आता अशी परिस्थिती आहे की राजीनामा घेतला तरीही आणि नाही घेतला तरीही ठाकरे सरकार संजय राठोड यांच्यामुळे अडचणीत येणार अशी चिन्हे दिसून येत आहेत.अधिवेशन काळात अवघ्या राज्याचे लक्ष विधिमंडळाकडे लागले असताना हा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यास सरकारची चांगलीच नाचक्की होणार आहे.आक्रमक विरोधकांना तोंड देणे अवघड होऊन बसल्याने यंदाच्या अधिवेशनाला सामोरे कसं जायचं या विवंचनेत राज्य सरकार आहे.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यसरकारवार तोफ डागली आहे.जो पर्यत संजय राठोड राजीनामा देणार नाही तो पर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. संजय राठोड अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार, असा कांगावा मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमातून केला आहे. मात्र हा केवळ आपल्या सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कधीही त्यांची हकालपट्टी करू शकतात, मग ही सर्व नाटकं कशासाठी ? तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखं करतो असा हा प्रकार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीमानाम्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मित्रपक्षांचा देखील दबाव असल्याचे पाहायला मिळत आहे. खा.शरद पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राठोड यांनी केलेल्या पोहरादेवी येथील शक्ती प्रदर्शनावरून नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच आघाडी सरकारमधील घटक पक्षांनीच टीकेचा सूर लावल्याने शिवसेना या प्रकरणात खिंडीत सापडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चित्रा ताई यांच्याविरुद्ध उघड षडयंत्र होतंय’
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- ‘बेजबाबदारपणे वागायला आम्ही संजय राठोड नाही’
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

