मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढू लागला आहे. राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत सामनातून अग्रलेख लिहून आल्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यानंतर त्या ठिकाणी जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले होते.
शिवसेना भवननंतर आता आज सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद थंड होत नाही. तोपर्यंत आज पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते समोर आले आहेत.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आ. वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते.ज्या पेट्रोल पंपावर हे वाटप करण्यात येणार होते तो पेट्रोलपंप नारायण राणे यांच्या मालकीचा होता. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर पोहचले त्यावेळी भाजपचे कार्यकर्तेही त्याठिकाण आले आणि राडा सुरु झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली आहे. शिवसेनेचे राजकीय डावपेच यशस्वी झाले आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असल्याचे शल्य भाजपच्या नेत्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा असून भाजपने देखील आता ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढविण्याचा चंग बांधला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चीतपट करून आपला बदला पूर्ण करण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. यामुळेच हा संघर्ष अधिक तीव्र होत असून अशा प्रकारच्या चकमकी आता होऊ लागल्या आहेत.
आगामी काळात शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष आणखी वाढत जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आणणे दोन्ही पक्षांचे नुकसान करणारे असणार आहे. किंबहुना तशी महाराष्ट्राची परंपरा देखील नाही. त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने आणि कार्यकर्त्यांनी संयमाने वागण्याची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर ‘त्या’ लोकांना १५ दिवस क्वारंटाईन करणार ; अजितदादांचा इशारा
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘बेपत्ता आमदार प्रताप सरनाईक मातोश्रीवरच’ ; भाजपचा खळबळजनक दावा
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
